नगर - मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह संपूर्ण मोफत प्रशिक्षणाची सुविधा डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर ट्रेनिंग इन्स्टिट्...
नगर - मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह संपूर्ण मोफत प्रशिक्षणाची सुविधा डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर ट्रेनिंग इन्स्टिट्युटच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी ही संधी मार्केट यार्डातील द टेक बह या संगणक संस्थेत उपलब्ध असून गरजूंनी फायदा घ्यावा असे आवाहन संचालक देवांग कुर्वा यांनी केले आहे.
प्रशिक्षण योजनेची माहिती देतांना संचालक किरण पुंड यांनी महानगर पालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठीच ही योजना असून मागासवर्गीय (एस.सी.) प्रमाणपत्र, आधार कार्ड सह संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ब्रॉड बँड इंटरनेट टेक्नीशियन, डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल, डोमेस्टीक बीपीओ (व्हॉइस-नॉन व्हॉईस), आय़टी हार्डवेअर अँण्ड नेटवर्कींग इंजिनिअर, सॉफ्टवेअर डेव्हलपर (इ कॉमर्स) असे पाच अभ्यासक्रम या योजनेअंतर्गत आहेत. 18 ते 30 वयोगटातील विद्यार्थ्यांनी या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यास नोकरीची संधी तुम्ही मिळवू शकता.










