नगर - धरणामध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता व सुरु झालेला उन्हाळा लक्षात ठेऊन वॉर्ड क्रमांक 19 मधील नागरिकांच्या सोयीसाठी आपण वॉर्डात...
नगर - धरणामध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता व सुरु झालेला उन्हाळा लक्षात ठेऊन वॉर्ड क्रमांक 19 मधील नागरिकांच्या सोयीसाठी आपण वॉर्डातील चारही दिशांना बोअरवेल करुन देत असून त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास वॉर्ड क्रमांक 19 मधील नगरसेविका खाजाबी कुरेशी यांनी व्यक्त केला.
बाबा बंगाली येथे बोअरवेल करतांना कुरेशी बोलत होत्या. यावेळी वॉर्डातील जागतिक आरीफ घौरी यांच्या हस्ते नारळ फोडून बोअरवेलच्या कामास सुरवात झाली. सरवर कुरेशी, मतीन तांबोळी, मुजफ्फर कुरेशी, रशीद कुरेशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुजाहीद कुरेशी (मा) यांनी परिश्रम घेऊन स्वखर्चातून वॉर्डमध्ये आठ ठिकाणी बोअरवेल बसविले. चार वसापूर्वी वॉर्डमध्ये आठ ठिकाणी बोअरवेल बसविले. चार दिवसापूर्वी वॉर्डातील मोकळ्या नळांना तोट्या बसविल्या. याकामी वॉर्डातील नागरिकांचे सहकार्य़ मिळत असल्याचे ते म्हणाले.
येत्या तीन वर्षात आपण आदर्श प्रभाग करु कुठलीही समस्या राहणार नाही असे काम करु असे आश्वासन खाजाबी कुरेशी यांनी यावेळी दिले.









