भाळवणी : पारनेर तालुक्यातील श्री नागेश्वर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आठवड्याच्या प्रत्येक रविवारी सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत गावात ...
भाळवणी : पारनेर तालुक्यातील श्री नागेश्वर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आठवड्याच्या प्रत्येक रविवारी सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येते. या उपक्रमांतर्गत रविवारी सकाळी येथील स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली.
प्रतिष्ठानच्या या उपक्रमात गावातील नागरीकही कार्यकर्त्यांसमवेत सहभागी होतात. यावेळी या अभियानात जिल्हा युवा केंद्राचे समन्वयक व येथील रहिवासी बाबाजी गोडसे, सोपान लोंढे, दीपक रोहोकले, संदीप रोहोकले, अनंत रोहोकले, अमोल रोहोकले, सुनील रोहोकले तसेच इतर कार्यकर्ते, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व पुढील नियोजनासाठी आठवड्याच्या दर शनिवारी रात्री ९.३0 वाजता येथील मारूती मंदिरात सोपान लोंढे, शंकर रोहोकले संपत कपाळे, गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली एक तास चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते. यावेळी ग्रामस्थ तसेच वाडी, वस्त्यांवरील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी होतात.










