अहमदनगर - सातत्याने बदलत्या शैलीमुळे होणारे शारिरीक व मानसिक विकार ही चिंतेती बाब आहे. भारतासारख्या महान देशातून जगाला योगाचे वरद...
अहमदनगर - सातत्याने बदलत्या शैलीमुळे होणारे शारिरीक व मानसिक विकार ही चिंतेती बाब आहे. भारतासारख्या महान देशातून जगाला योगाचे वरदान देणाऱ्या संशोधनाची महती मोठी आहे. मानवी शरिराला सुक्ष्म पध्दतीने प्रभावीपणे कार्य करणाऱ्या योगाअभ्यासकाची गरज आहे. आरोग्यवर्धीनीच्या माध्यमातून झालेले हजारो महिलांचे संघटन हे योग प्रचार प्रसाराचे प्रभावी माध्यम आहे. योगामध्ये सुक्ष्म अभ्यास व संशोधनाच्या माध्यमातून योग प्रचार व प्रसाराची धुरा महिलांनी पुढे चालवावी अशी अपेक्षा राष्ट्रीय किर्तीचे योगतज्ञ डॉ.अनिल जयवंत यांनी व्यक्त केली.
आरोग्यवर्धीनी संकल्प बालरुग्णालय, आयोजित महिला दिन कार्यक्रमप्रसंगी योगदुत महिला मंडळ सन्मान प्रसंगी डॉ.जयवंत बोलत होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.हेमांगिणी पोतनिस, प्राचार्या डॉ.हेमा सेलोत, डॉ.संदिप व डॉ.कल्याण गायकवाड, नगरसेविका सौ.शितल जगताप, केशरबागचे अनेल मेहेर उपस्थित होते.
याप्रसंगी इनरव्हिल, लायन्स व शुभा बोगावत यांच्या हस्ते गेली महिनाभर नगर शहर व उपनगरात योगदुत म्हणून कार्य करणाऱ्या महिला मंडळ व त्यांच्या अध्यक्षांचा सन्मान कऱण्यात आला.










