नगर - दि अहमदनगर जिल्हा टिंबर लघु उद्योग असोसिएशनची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत नगरसेवक अनिल शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी, तसेच उप...

नगर - दि अहमदनगर जिल्हा टिंबर लघु उद्योग असोसिएशनची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत नगरसेवक अनिल शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी, तसेच उपाध्यक्षपदी मगनभाई पटेल, नारायण हासे, सचिव जेटालाल पटेल, सहसचिव प्रकाश भोसले, सहसचिव मोहन पटेल, खजिनदारपदी देवसी पटेल आदींची निवड करण्यात आली.
यावेळी श्री. शिंदे, तसेच नूतन पदाधिकारी व महाराष्ट्र टिंबर लघुउद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी जटालाल पटेल यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी हरजीभाई दिवाणी, भीमजीभाई पटेल, नारायण पटेल, रवींद्र चोथवे, चिमणलाल पटेल, प्रकाश भोसले, मोहन पटेल, वकार शेख, विलास शिंदे, माधव क्षीरसागर, रामदास मांडगे, अंबादास पोकळे, रोशन शर्मा, अरुण चव्हाण, कांतीलाल पटेल, पुरुषोत्तम पटेल, रवींद्र चोथवे, प्रवीण पटेल आदी उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देताना नूतन अध्यक्ष श्री. शिंदे म्हणाले की, दि अ.नगर जिल्हा टिंबर लघुउद्योग असो.चे सर्व पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन काम करू. जिल्ह्यात सुमारे 300 ते 350 सॉमिल व्यावसायिक त्यांचे प्रश्न सोडविले जातील. महासंघाचे अध्यक्ष जटालाल पटेल म्हणाले की, महासंघाच्या पुढाकाराने पूर्वीची नियमावली रद्द करून 2014ची वन नियमावली लागू झाली आहे. परवान्याचे हस्तांतरण आता होऊ शकते. वाहतूक परवाना आता रद्द झाला आहे. नियमात नसतानाही तात्पुरता परवाना देण्यात येत असून, तो नियमित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सरकार कालबाह्य कायदे रद्द करीत असून, त्यामुळे व्यवसाय करताना सुलभता येत आहे, असे ते म्हणाले.









