अर्धवट प्रकल्पांसाठी ४0 हजार कोटींचे कर्ज गिरीष महाजन : कुकडी, निळवंडे, ताजनापूर, भुतवडा प्रकल्पाचा समावेश वांबोरी चारीचा फुटबॉल ...
अर्धवट प्रकल्पांसाठी ४0 हजार कोटींचे कर्ज
गिरीष महाजन : कुकडी, निळवंडे, ताजनापूर, भुतवडा प्रकल्पाचा समावेश
वांबोरी चारीचा फुटबॉल
आ. कर्डिले यांनी वांबोरी चारीचा फुटबॉल 14 टीएमसी पाण्यापर्यंतच आहे, तो खाली सोडावा, अशी मागणी केली. त्यावर महाजन यांनी त्यांच्या फुटबॉलची काय भानगड आहे, असा सवाल उपस्थित करताच सभागृहात एकच हशा उडाला. पाचपुतेंच्या मागणीवर जगतापांचा आक्षेप माजी मंत्री पाचपुते यांनी विसापूर धरणाचा मुद्दा उपस्थित केला. विसापूर धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाची माहिती सादर करण्याची त्यांनी मागणी केली. त्यावर बिराजदार यांनी उंची वाढविण्याचा नवीन प्रस्ताव तयार करावा लागेल, असा खुलासा केला. पाचपुते यांनी धरणाची उंची वाढविण्याच्या केलेल्या मागणीवर राहुल जगताप यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, धरणात पाणीच येत नाही, उंची वाढविण्यापेक्षा या धरणाचा समावेश कुकडी प्रकल्पात करावा, अशी मागणी
केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलताना जलसंपदामंत्री गिरीष महाजन. या बैठकीला पालकमंत्री राम शिंदे, पी. ए. बिराजदार, एच. एम. शिंदे, जिल्हाधिकारी अनिल कवडे आदी उपस्थित होते. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या सिंचन घोटाळ्याची लाचलुचपत खात्याकडून चौकशी सुरू आहे. सरकारवर कुठलाही दबाव नाही. चौकशी नि:पक्षपणे सुरू असून, दोषींवर कडक कारवाई होणार आहे, असे सांगून, याप्रकरणी सरकार कुणाचीही गय करणार नाही, असे महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले. नि:पक्ष चौकशी पश्चिम वाहिन्यांचे पाणी आणणे शक्य आहे. अवघ्या 25 लाखात 6 टीएमसी पाणी उपलब्ध होईल. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. हरिश्चचंद्र गडाच्या पायथ्याशी वळणे घालून पाणी नगर जिल्ह्यासाठी आणावे.
भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार - निळवंडे धरणाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र वितरिकांचे काम अपूर्ण असून, ते पूर्ण करण्यात यावे. तसेच वैतरणाचे पाणी आणण्यासाठी आराखडा तयार करावा. स्नेहलता कोल्हे, आमदार राज्यातील आदर्श ताजनापूर प्रकल्प टप्पा दोन पूर्ण करण्यासाठी निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी. या प्रकल्पामुळे मोठय़ा प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी 90 कोटींच्या निधीची आवश्यकता असून, हा निधी उपलब्ध करून द्यावा. -मोनिका राजळे, आमदार समन्यायी पाणी वाटपाबाबतचा निर्णय घेण्यात यावा. जायकवाडी धरणात पाणी सोडल्याने शेवगाव, पाथर्डी आणि नेवासा तालुक्यावर अन्याय होत असून, याविषयी निर्णय घेण्यात यावा. तसेच लाख धरणाच्या कामासाठी निधीची तरतूद करावी.
बाळासाहेब मुरकटे, आमदार - शेतकर्यांना कर्जमाफीची नव्हे तर पाण्याची गरज आहे. वीज आणि पाणी दिल्यास शेतकरी सोनं पिकवतील, असे सांगून राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली धरणे पूर्ण करण्यासाठी 30 ते 40 हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याची घोषणा जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केली. जलसंपदा विभागाच्या 50 हजार कोटींच्या प्रकल्पांना मागील काळात मंजुरी देऊन अगाऊ रक्कम अदा करण्यात आली, मात्र प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. नियोजनात गडबड झाली. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रकल्प कागदावरच राहिले. अर्धवट प्रकल्पांसाठी 40 हजार कोटींचे कर्ज अहमदनगर : राज्याच्या अर्थसंकल्पात नगर जिल्ह्यातील कुकडी, निळवंडे, ताजनापूर आणि विसापूर धरणासाठी भरीव तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
जलसंपदामंत्री महाजन यांनी जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, गोदावरी खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक पी. ए. बिराजदार, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक के.एम. शहा, मुख्य अभियंता एच. एम. शिंदे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, आ. शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, राहुल जगताप, भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील २२ प्रलंबित प्रकल्पांचा विषय बैठकीसमोर होता. प्रत्येक प्रकल्पाची माहिती यावेळी घेण्यात आली. जिल्ह्यातील कुकडी प्रकल्प व वितरिका, निळवंडे धरण व वितरिका, अमृतलिंग, भुतवडा, वांबोरी चारी, लाख धरण, ताजनापूर प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्याच्या अगामी अर्थसंकल्पात अधिकाधिक निधीची तरतूद करण्यात येईल, असे ते म्हणाले.










