चितळे रोडवरील नेहरू मार्केटचा प्रश्न पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नेहरु मार्केटची जागा बीओटी तत्वावर देण्याच्या जुन्या ठराबाबत...
चितळे रोडवरील नेहरू मार्केटचा प्रश्न पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नेहरु मार्केटची जागा बीओटी तत्वावर देण्याच्या जुन्या ठराबाबत सभेत गदारोळ उडाला. ही जागा बीओटी तत्वावर देण्यापेक्षा मनपा स्वतः कर्ज काढून ही जागा स्वतः का विकसीत करीत नाही, असा मुद्दा चर्चिला गेला. शहरातील ११ हजार स्के.फुटाची एवढी मध्यवर्ती जागा कमी प्रिमियममध्ये (२.२५ कोटी) देवून प्रशासन ती कोणाच्या घशात घालत आहे असा सवाल बाळासाहेब बोर्हाटे, किशोर डागवाले या सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी श्री. बोर्हाटे यांनी बुरूडगाव मार्केटचा दाखला देत ही जागाही केवळ ३ कोटी ६३ लाखात बिल्डरच्या घश्यात घालण्यात आल्याचे म्हटले. तसाच प्रकार नेहरू मार्केटबाबतही सुरू असल्याचे ते म्हणाले.










