नगर - डाकसेवेबाबतचीतक्रार सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असल्यास त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी येत्या २२ मार्चला सकाळी ११ ...
नगर - डाकसेवेबाबतचीतक्रार सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असल्यास त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी येत्या २२ मार्चला सकाळी ११ वाजता डाकघर येथील वरिष्ठ अधीक्षक कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंगळवारी देण्यात आली. प्रलंबित असलेल्या तक्रारीबाबत अर्ज मूळ तक्रारीची प्रत १५ मार्चपर्यंत सादर करावी. त्यानंतर आलेल्या तक्रारी डाक अदालतीमध्ये घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती वरिष्ठ अधीक्षक ए. व्ही. गायकवाड यांनी दिली.










