पुण्यातील मोर्चात नगरमधून १५ हजार सराफ व्यावसायिक सहभागी होणार अहमदनगर - केंद्र सरकारने दागिन्यांवर लावलेली एक्साईज ड्युटीला देशभरात...
पुण्यातील मोर्चात नगरमधून १५ हजार सराफ व्यावसायिक सहभागी होणार
सराफ व्यावसायिकांना एक टक्का भरण्यास आमचा विरोध नाही. पण, तो एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून देण्याला आमचा विरोध असल्याचे मुथा यांनी सांगितले. या व्यवस्थेतून केंद्र सरकार इन्स्पेक्टर राज आणण्याची तयारी केली आहे. या प्रकारामुळे सराफांना दागिन्यांच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब द्यावा लागणार आहे. सराफांनी हिशोब द्यायचा की, व्यवसाय करायचा हा प्रश्न येथे येतो. त्यामुळे केंद्र सरकाराने याचा विचार करावा, असेही ते म्हणाले.
कॉंग्रेस सरकारने २0१२ साली सराफ व्यावसायिकांना एक्साईज ड्युटीखाली आणण्याचा घाट घातला होता. त्यावेळी देशभरातून सराफ व्यावसायिकांनी विरोध केला होता. त्यावेळी व्यावसायिकांनी सुमारे २१ दिवस बंद पाळला होता. त्याचे परिणाम कॉंग्रेस सरकारला भोगावे लागले होते. याची आठवण मुथा यांनी यावेळी करून दिली. अहमदनगर जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांचा देखील या एक्साईज ड्युटीला विरोध आहे. त्यामुळे पुणे येथील गुरूवारच्या मोर्चात जिल्ह्यातून सुमारे १५ हजार व्यावसायिक सहभागी होतील, असे मुथा यांनी सांगितले. यानंतर देखील सरकारला जाग आली नाही तर प्रत्येक राज्यात रास्ता रोको आंदोलन केले जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.










