Archive Pages Design$type=blogging

बाडगव्हाण येथे स्वस्त धान्य दुकानात धान्याचा अपहार, ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली तक्रार

शेवगाव - बाडगव्हाण येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी कार्डधारकांचा गहू, तांदूळ, साखर मालाचा फेब्रुवारीचा साठा उचलला. मात्र, रेशनकार्ड...




शेवगाव - बाडगव्हाण येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी कार्डधारकांचा गहू, तांदूळ, साखर मालाचा फेब्रुवारीचा साठा उचलला. मात्र, रेशनकार्डधारकांना वाटप करतांना परस्पर विल्हेवाट लावली. या गैरप्रकारची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पुरवठा विभागाकडे निवेदनाद्वारे केली. बाडगव्हाण येथील पुरुष बचत गटाच्या वतीने शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदारांनी फेब्रुवारीचा गोरगरीब जनतेला दिला जाणारा १४ क्विंटल गहू, १० क्विंटल तांदूळ, 2 क्विंटल साखर असा मिळून २६ क्विंटल अंत्योदय इतर धान्य स्वस्त धान्य दुकानदारांनी २४ फेब्रुवारी रोजी तालुका पुरवठा अधिकाऱ्याकडे चलनाद्वारे पैसे भरणा करून या मालाचा साठा उचलण्यात आला. मात्र, या दुकानदारांनी महिना संपला, तरी शासनाकडील स्वस्त धान्याचे वाटप केले नाही. या मालाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित राहिले आहेत. ग्रामस्थांनी धान्य दुकानदाराकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या प्रकाराची चौकशी करून संबंधित दुकादारांवर कारवाई करण्यात यावी; अन्यथा या प्रश्नी आंदोलन करण्याचा इशारा रामकिसन काजळे, भगवान राऊत, अशोक काजळे, राजेंद्र गरुड, हनुमंत राऊत, पांडुरंग गरुड, मधुकर मिसाळ, 
अप्पासाहेब काजळे आदींनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

"आधार'साठी धान्य पुरवठा खंडित स्वस्त धान्य दुकानदारांनी साठा उचलला आहे. मात्र, रेशनकार्डधारकांना आधारकार्ड सक्तीचे केल्याने ते जमा करण्यासाठी रेशनकार्डधारकांचा धान्य पुरवठा खंडित केला आहे. आधारकार्डाचे झेरॉक्स जमा केल्यास धान्य पुरवठा सुरळीत केला जाणार आहे. - संदीप चिंतामणी, पुरवठानिरीक्षक. चौकशीकरून कारवाई करा साखर, गहू, तांदूळ या धान्याचा पुरवठा गायब झाल्याने बाडगव्हाण येथील गरीब जनतेला धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. येथील झालेल्या गैरप्रकाराची तातडीने चौकशी करून कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल. - रामकिसन काजळे, तक्रारदार. १० मार्च रोजी पुणे येथील राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन वर्मा यांनी केले. सूत्रसंचालन तुषार दहिवाळकर यांनी केले, तर आभार संजय शेवाळे यांनी मानले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: बाडगव्हाण येथे स्वस्त धान्य दुकानात धान्याचा अपहार, ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली तक्रार
बाडगव्हाण येथे स्वस्त धान्य दुकानात धान्याचा अपहार, ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली तक्रार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgms3_X3GTRCs-6Wj7NBLQzWOnI7l9Bl5YdoBCgNzn-hDtDo2ngzcLwHEiR-obCctLfcBq_15d_VtHzlkq387i3JYpzUZRluPqhiIiQu2lYu0pqXTdrOPVjGfOTqOhUjb1VPE9AhSxircTl/s1600/Swast+dhany.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgms3_X3GTRCs-6Wj7NBLQzWOnI7l9Bl5YdoBCgNzn-hDtDo2ngzcLwHEiR-obCctLfcBq_15d_VtHzlkq387i3JYpzUZRluPqhiIiQu2lYu0pqXTdrOPVjGfOTqOhUjb1VPE9AhSxircTl/s72-c/Swast+dhany.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_168.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_168.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago