नगर - श्री संत सेना सेवाभावी संस्था अहमदनगर या सेवाभावी संस्थेची सर्वसाधारण सभा संस्थेचे माजी अध्यक्ष श्री शिवाजी दळवी यांचे अध्यक्षते...
नगर - श्री संत सेना सेवाभावी संस्था अहमदनगर या सेवाभावी संस्थेची सर्वसाधारण सभा संस्थेचे माजी अध्यक्ष श्री शिवाजी दळवी यांचे अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली.
या सभेत सर्वानुमते स.न.2016 ते 2021 पर्यंत खालील प्रमाणे बिनविरोध खालील प्रमाणे पदाधिकारी निवडण्यात आले.अध्यक्ष गोकूळ दगडू मगर, उपाध्यक्ष सुनिल पांडुरंग पंडित, सचिव विक्रम मोतीराम सोनवणे, खजिनदार शहाजी परमेश्वर कदम या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संस्थेचे विश्वस्त ज्ञानेश्वर
ठकाजी गायकवाड, बबन रामभाऊ भुजबळ, दिलीप शंकर मगर, सौ.सविता सोनवणे, सौ.लता दळवी व माजी अध्यक्ष शिवाजीराव दळवी यांनी सर्वांचा सत्कार केला. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.










