पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील गोरेश्वर पतसंस्थेत संतोष आढाव हे क्लार्क पदावर असतांना त्यांनी 2013 साल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त...
पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील गोरेश्वर पतसंस्थेत संतोष आढाव हे क्लार्क पदावर असतांना त्यांनी 2013 साल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संस्थेने आढाव यांना फंड आणि इतर रक्कम दिली मात्र ग्रॅच्युइटी रक्कम न मिळाल्याने आढाव यांनी कायद्यानुसार नमुना आयमध्ये नोटिस दिली. तरीही संस्थेने रक्कम न दिल्याने कोर्टात केस दाखल झाली. यावर संस्थेने ग्रॅच्युइटीची तरतूद लागू होत नसल्याचा मुद्दा मांडत अपील दाखल केले. यावर आढाव यांच्या वतीने अॅड.सुधीर टोकेकर यांनी ग्रॅच्युइटी कायदा 1972 च्या तरतुदीनुसार कोणालाच स्वतःच्या मनाप्रमाणे कायदा करता येणार नाही. तसेच आढाव यांची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त झालेली असल्याने कायद्याप्रमाणे ही रक्कम आढाव यांना मिळालीच पाहिजे अशी बाजू मांडली. अॅड.टोकेकर यांची ही बाजू ग्राह्य धरुन औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीशांनी आढाव यांना ग्रॅच्युइटी रक्कम देण्याचा कायद्याप्रमाणे हि रक्कम आढाव यांना मिळालीच पाहिजे अशी बाजू मांडली. अॅड.टोकेकर यांची ही बाजू ग्राह्य धरुन औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीशांनी आढाव यांना ग्रॅच्युइटी रक्कम देण्याचा आदेश दिल्याने आढाव यांना नुकतीच न्यायालयाच्या निकालामुळे ग्रॅच्युइटी रक्कम मिळाली आहे. तसेच इथून पुढे कोणत्याही संस्थेने कर्मचाऱ्यास ग्रॅच्युइटी रक्कम न दिल्यास आपण कायद्यान्वये कर्मचाऱ्यास रक्कम मिळवून देऊ अस आवाहन पतसंस्था कर्मचारी संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी अॅड.सुधीर टोकेकर यांनी केलंय.










