अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या ढवळपूरी ता. पारनेर येथील श्री दुर्गादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शा...
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या ढवळपूरी ता. पारनेर येथील श्री दुर्गादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत उत्तुंग यश संपादित केले आहे. विद्यालायाचा शासकीय एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल ८४ टक्के तर एंटरमेडीएट ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
विद्यालयामध्ये ही परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. यामध्ये एलिमेंटरी परीक्षेत कु. पारखे साक्षी हनुमंत हिला 'अ'' श्रेणी, तर कु. चितळकर दिव्या रमेश, चि. पवार आदित्य विक्रम, चि. पवार रोहित विट्ठल, चि. पवार विशाल धोंडिराम या विद्यार्थ्यांनी 'ब' श्रेणी प्राप्त केलि आहे. तसेच इंटरमिडीएट ग्रेड परीक्षेत कु. चौधरी रुतुजा सोनाजी, चि. गावडे आकाश ज्ञानेश्वर, चि. शेख सिराज दाउत या विद्यार्थ्यांनी 'ब' श्रेणी प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे अन्य उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी 'क' श्रेणी प्राप्त केलि आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जिल्हा मराठा संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे पाटिल, सचिव जी.डी. खानदेशे, जेष्ठ विश्वस्त रामनाथ वाघ, सीताराम खिलारी साहेब, श्री दुर्गादेवी विद्यालायाचे मुख्याध्यापक पि. व्ही. नरसाळ, पर्यवेक्षक एम्.डी जासुद आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनन्दन केले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कलाशिक्षक रामदास कवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.










