नगर:- आनंदऋषीजी हॉस्पिटल हे कित्येक वर्षापासून गोर-गरीब जनतेला व उचित दरात स्वास्थसेवा देत आहे. हे महान कार्य करणे सोपे नाही. यामागे ...
नगर:- आनंदऋषीजी हॉस्पिटल हे कित्येक वर्षापासून गोर-गरीब जनतेला व उचित दरात स्वास्थसेवा देत आहे. हे महान कार्य करणे सोपे नाही. यामागे चांगल्या सेवकांची टिम काम करत आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद देण्यात आनंदऋषीजी हॉस्पिटलचे मोठे योगदान आहे. शिवाय मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करुन फार चांगले काम करत आहे. असेच मानव सेवा अखंड पुढे चालु ठेवुन दिन दुग्गनी रात चौगणी प्रगती करावी असे प्रतिपादन बी.एस.एन.एल.चे मुख्य महाप्रबंधक अजातशत्रु सोमाणी यांनी केले.
आचार्य श्री आनंदऋषीजी यांच्या 24 व्या पुण्यस्मृतीनिमित्त श्रीमती जयकुमारबाई मोतिलाल लोढा परिवाराच्यावतीने आनंदऋषीजी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ अहमदनगर सेवायात्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत दंत तपासणी शिबीराचे उद्घाटन बी.एस.एन.एल.चे मुख्य महाप्रबंधक आजतशत्रु स ोमाणी यांनी केले. यावेळी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दिप चव्हाण, उबेद शेख, सुरेंद्र लोढा, सौ. अलका लोढा, सेवा यात्रीच्या माजी अध्यक्षा मनिषा लोढा, तपासणी शिबीराचे दंतरोग तज्ञ डॉ.मंजुषा गांधी व डॉ.श्रीकांत सांयबर, संतोष बोथरा, अक्षय गुगळे, सुभाष मुनोत, कुंदन कांकरिया, अनिल मेहेर, वसंत चोपडा, डॉ.अशिष भंडारी, डॉ.मनोहर पाटीलआदिंसह मोठ्या संख्येने रुग्ण व नागरिक उपस्थित होते.










