नगर - नगर तालुयातील बाबुर्डी घुमट येथील दिव्यांग खेळाडू अभिजित माने याने अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने नाग...
नगर - नगर तालुयातील बाबुर्डी घुमट येथील दिव्यांग खेळाडू अभिजित माने याने अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने नागपुर येथे नुकत्याच आयेाजित केलेल्या राज्यस्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत 13 ते 16 वर्ष वयोगटात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्याचा बाबुर्डी घुमट येथील ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सरपंच सौ.लताबाई गवळी यांच्या शुभहस्ते फेटा बांधुन व शाल र्श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच जनार्धन माने, शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. कमल माने, जगन्नाथ माने, पोलिस पाटील अशोक पंचमुख, दत्तु परभणे, पंचमुख गुरुजी आदींसह ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.










