राहुरी - राहुरी शहरातील इंगळे वसाहतमध्ये 7 मार्च रोजी भर दिवसा बंद असलेला बंगला फोडून लाखो रूपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरट्यांनी...
राहुरी - राहुरी शहरातील इंगळे वसाहतमध्ये 7 मार्च रोजी भर दिवसा बंद असलेला बंगला फोडून लाखो रूपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन करून राहुरी पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.
याबाबत, शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात असणार्या केशर पतसंस्थेच्या मागील बाजूला असणार्या इंगळे वसाहतमध्ये भानूदास यशवंत वराळे यांचा हिरा नावाचा बंगला असून वराळे हे 7 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजे दरम्यान महाशिवरात्री निमीत्त राहुरी खुर्द येथील राजेश्वर मंदिर येथे सहपरिवार दर्शनासाठी गेले असता दुपारी 12 ते 1 वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील सर्व कपाटांची उचकापाचक करून एका कपाटात असलेले 4 तोळ्याचे सोन्याचे गंठण व 1 तोळ्याचे कानातील वेल असे एकूण 5 तोळे सोन्याचे दागिने व 50 ते 60 हजार रूपये रोख रक्कम घेऊन घराच्या मागील दरवाजाने चोरट्यांनी पलायन केले. याबाबत वराळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावेळी दोन तीन अज्ञात तरूण विना क्रमांकच्या दुचाकीवर आले होते अशी परिसरातील नागरीकांमधून चर्चा सुरू आहे.भर दिवसा राहुरीत धाडसी चोरी
राहुरी - राहुरी शहरातील इंगळे वसाहतमध्ये 7 मार्च रोजी भर दिवसा बंद असलेला बंगला फोडून लाखो रूपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन करून राहुरी पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.
याबाबत, शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात असणार्या केशर पतसंस्थेच्या मागील बाजूला असणार्या इंगळे वसाहतमध्ये भानूदास यशवंत वराळे यांचा हिरा नावाचा बंगला असून वराळे हे 7 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजे दरम्यान महाशिवरात्री निमीत्त राहुरी खुर्द येथील राजेश्वर मंदिर येथे सहपरिवार दर्शनासाठी गेले असता दुपारी 12 ते 1 वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील सर्व कपाटांची उचकापाचक करून एका कपाटात असलेले 4 तोळ्याचे सोन्याचे गंठण व 1 तोळ्याचे कानातील वेल असे एकूण 5 तोळे सोन्याचे दागिने व 50 ते 60 हजार रूपये रोख रक्कम घेऊन घराच्या मागील दरवाजाने चोरट्यांनी पलायन केले. याबाबत वराळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावेळी दोन तीन अज्ञात तरूण विना क्रमांकच्या दुचाकीवर आले होते अशी परिसरातील नागरीकांमधून चर्चा सुरू आहे.










