महापालिकेच्या मालकीची व ताबा असलेली कैकाडी महाराज संकुलाजवळील फायर ब्रिगेड कार्यालय, जुनी मनपा इमारत, मोटार गॅरेज अशी ९ एकरच्या जागेचा...
महापालिकेच्या मालकीची व ताबा असलेली कैकाडी महाराज संकुलाजवळील फायर ब्रिगेड कार्यालय, जुनी मनपा इमारत, मोटार गॅरेज अशी ९ एकरच्या जागेचा उतारा अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या नावे निघत असल्याचा मुद्दा श्री. बोर्हाटे यांनी उपस्थित केला. तेव्हा नगररचना विभागाचे के.वाय बल्लाळ यांनी माहिती देताना सांगितले की, २00३ साली या जागेचा उतारा काढण्यात आला, तो १९७५ पासून अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या नावे निघाल्याचे लक्षात आले. तेव्हा नगर भूमापन विभागाकडे मनपाने अपिल दाखल केले. त्याचा निकाल मनपाचे या जागेवर नाव लागावे असा निकाल देण्यात आला. मात्र या संस्थेने या निर्णयाबाबत भूमि अभिलेख अधिक्षकांकडे अपिल दाखल केल्याचे सांगितले. ही जागा मनापाची असून या संपूर्ण जागेवर ताबाही मनपाचाच असल्याचे ते म्हणाले.










