नगर- अहमदनगर येथील निमगांव वाघा मधील डोंगरे वस्तीतील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशिय संस्थेतर्फे पर्यावरणपूरक अशी होळी साजरी करण्य...
नगर- अहमदनगर येथील निमगांव वाघा मधील डोंगरे वस्तीतील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशिय संस्थेतर्फे पर्यावरणपूरक अशी होळी साजरी करण्यात आली. संस्थेच्या वतीने लाकडे न जाळता परिसरातील कचरा, तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट इत्यादी गोळा करुन होळी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक पै.नाना डोंगरे यांनी याप्रसंगी होळीविषयी महत्व सांगितले, ते म्हणाले पूर्वीच्या काळी वनसंपदा भरपूर होती त्यामुळे लाकडे जाळून ती होळी साजरी केली जात असे. परंतु आता जंगले, वनसंपदा नष्ट झालेली आहे. पाणी नाही, पाऊस नाही म्हणून सर्वांनी झाडे लावली पाहिजेत. जंगले निर्माण केली पाहिजेत. तसेच तरुणांनी गुटखा, तंबाखू, दारु अशा व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, जेणेकरुन आरोग्य चांगले राहील व कुटूंब व्यवस्था टिकून राहतील.
ग्रामीण भागातील बुवाबाजी, अंधश्रद्धा, गुप्तधनाची लालसा, मुलींची भ्रुणहत्या यासारख्या समस्यांनी संपूर्ण देशाला ग्रासलेले आहे, त्याकरिता अंधश्रद्धेपासून सर्वांनी दूर राहिले पाहिजे, असे आवाहन पै.डोंगरे यांनी केले.
याप्रसंगी युवक, महिला, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










