पिंपरी - कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी विकासासाठी त्या राष्ट्रातिल मानव संसाधन विकसित असणे खुप गरजेचे असते. हीच गरज ओळखुन नेक्टर ...
पिंपरी - कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी विकासासाठी त्या राष्ट्रातिल मानव संसाधन विकसित असणे खुप गरजेचे असते. हीच गरज ओळखुन नेक्टर ट्रेडमार्टचे व्यवस्थापकीय संचालक 'प्रशांत झावरे पाटिल' यांनी देशातील वेगवेगळ्या राज्यांमाधिल पाच लाख लोकांना वेगवेगळ्या विषयांवर मोफत प्रशिक्षण देण्याचा संकल्प सोडला आहे.
देशातील नैसर्गिक साधन संपत्ति प्रमाणेच मनुष्यबळ किंवा मानव संसाधन ही सुद्धा एक प्रकारची साधानसंपत्ति आहे. ज्या राष्ट्रामध्ये कुशल आणि विकसित मनुष्यबळ असते ते राष्ट्र विकसित समजले जाते. त्या राष्ट्रामध्ये मानव संसाधन विकासासाठी विशेष प्रयत्नही होतात. त्यामुळे जर राष्ट्राचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम त्या राष्ट्रातिल मानव संसाधन विकसित असने गरजेचे आहे. हे माहिती असल्यामुळ नेक्टर ट्रेड मार्टचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत झावरे पाटिल यांनी देशभर वेगवेगळ राज्यांमध्ये मानव संसाधनांशी संभंधित वेगावेगाल्या विषयांवर तब्बल पाच लाख लोकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा संकल्प सोडला आहे.
या महाअभियानाम्ध्ये समर्थ भारत परिवार, समर्थ भारत मानव संसाधन विकास संस्था, चैतन्य ग्रामविकास मंडळ, पैसिफिक फाउंडेशन, अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, आशा अनेकांचा सहभाग असल्याची माहिती प्रशांत झावरे पाटिल यांनी दिली.
या अभियानामध्ये राष्ट्रीय मानव संसाधनास पूरक अशा आरोग्य, शिक्षण, बालसंगोपन, रोजगार, उद्योग-व्यवसाय, शेती, पशुसंगोपन इत्यादि अनेक विषयांवर प्रशिक्षण देण्यात येइल. प्रशिक्षणार्थी म्हणून विद्यार्थी, पालक, शिक्षक, युवक, युवती, नोकरदार, व्यावसायिक, अबालवृद्ध, इत्यादि सर्वच जन सहभागी होऊ शकतात. प्रामुख्याने येत्या शैक्षणिक वर्षात राबविल्या जाणाऱ्या या महाभियानामध्ये या आधी भारतभर लाखो लोकांना प्रशिक्षण देणाऱ्या समर्थ भारत परिवाराचाही सहभाग असणार आहे. अशी माहिती 'नेक्टर ट्रेड मार्टचे व्यवस्थापकीय संचालक' तथा प्रशांत झावरे पाटिल यांनी दिली.










