साहित्यिक डॉ.टी.एन.परदेशी यांचा पुरस्काराबद्दल सन्मान अहमदनगर- वैज्ञानिक स्पर्धेच्या धावत्या युगात साहित्य व त्यामधील विचार उमेद...
साहित्यिक डॉ.टी.एन.परदेशी यांचा पुरस्काराबद्दल सन्मान
अहमदनगर- वैज्ञानिक स्पर्धेच्या धावत्या युगात साहित्य व त्यामधील विचार उमेद व प्रेरणा देतात, नगरचे साहित्यिक डॉ.ए.टी.एन.परदेशी यांच्या 'गर्भगिरी ते नागपंथी' या साहित्याचा जळगांव येथे झालेला पुरस्कार रुपी गौरव समाजाचा दिशादर्शक असल्याचे उद्गार वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांनी काढले.
मराठी भाषादिनाचे औचित्य साधून साहित्यिक डॉ.अरुण मांडे यांनी डॉक्टर लोकमान्य मल्टीस्टेटच्या वतीने मंडेलाचा राजबंदी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अग्निपंख, उठ मराठ्या उठ, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, वाघनख, जय हिंद जय महाराष्ट्र, अशी पुस्तक वाचनालयास देण्यात आली.
सहकार्यवाह उदय काळे यांनी वाचनालयाच्या कार्याची माहिती दिली. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.










