श्रीगोंदा - शेतमजुर म्हणून कामास असलेल्या 24 वर्षीय विवाहीतेबरोबर बळजबरीने लग्न करुन तीच्याबरोबर तीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध...
श्रीगोंदा - शेतमजुर म्हणून कामास असलेल्या 24 वर्षीय विवाहीतेबरोबर बळजबरीने लग्न करुन तीच्याबरोबर तीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याबद्दल घारगांव येथील भाऊसाहेब मारुती टिळेकर यांच्याविरुध्द बेलवंडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी जालना जिल्ह्यातील ता.भोकरदन, बोरगाव येथील 24 वर्षीय विवाहिता घारगाव येथे शेतमजूर म्हणून कामास होती. तीला दुसऱ्या लग्नास बळजबरी करुन आळंदी येथे लग्न लावून तीचे इच्छेविरुध्द तालुक्यातील घारगांव, पारगांव, बेलवंडी, मढेवडगांव अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तेथील भाड्याच्या खोलीत तिच्या बरोबर शारिरीक संबंध प्रस्थापित केले. ही घटना 29 डिसेंबर 2015 ते 24 फेब्रुवारी 2016 दरम्यान आरोपीने वारंवार हे कृत्य केले व या प्रकरणाची कुठे वाच्यता केली अथवा पोलीस केस केल्यास जीवंत जाळून टाकील अशी धमकी दिली. फिर्य़ाद दाखल झाल्यानतंर आरोपी पळून गेला आहे. त्याच्यावर भा.द.वि.376, 506, 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.सचिन वांगडे हे करीत आहेत.










