सिमला - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा टी-२० विश्वचषकातला आहे. हा सामना धर्मशालेत झाला नाही तर आयसीसी या ठिकाणी आयोजित करण्...
सिमला - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा टी-२० विश्वचषकातला आहे. हा सामना धर्मशालेत झाला नाही तर आयसीसी या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या मॅचवर बंदी घालू शकते. राज्य सरकारला मी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष असल्याने काही अडचण असेल तर मी त्या पदाचा राजीनामा देण्यासही तयार आहे. मात्र, हा सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आला नाही तर देश आणि हिमाचल प्रदेशच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, अशा शब्दांत बीसीसीआयचे सचिव आणि एचपीसीएचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली.
येत्या मार्चपासून भारतामध्ये टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत १९ मार्च रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाक यांच्यातील सामन्याचे आयोजन धर्मशालेत करण्यात आले. मात्र, काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी सामना आयोजित करण्यास मोठा विरोध केला जात आहे.










