नगर - अहमदगनरमधील इतर तालुक्याप्रमाणेच नेवासा तालुक्याचीही परिस्थीती भयानक आहे त्यामुळे लवकरच नेवास तालुकाही दुष्काळग्रस्त जाहिर हो...
नगर - अहमदगनरमधील इतर तालुक्याप्रमाणेच नेवासा तालुक्याचीही परिस्थीती भयानक आहे त्यामुळे लवकरच नेवास तालुकाही दुष्काळग्रस्त जाहिर होणार आहे. त्यामुळे सुधारित आणेवारीमध्ये तालुक्याचा समावेश होणार आहे. शेतीविषयक विविध योजना व तंत्रज्ञानाचा वापर करुन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याने कोणावरही उपोषण आणि आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे प्रतिपादन आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी शेतकरी कृषि मित्र मेळावा, निंभारी (ता.नेवासा) येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी गर्दे यांच्या शेतात आय़ोजीत केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
श्रेष्ठींना तालुक्यातील परिस्थिती सांगितलेली असून कृषिमित्र शासन व शेतकरी यांच्यामधील दुवा असून, कृषीच्या योजना पोहोचविण्याचे काम करणार आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पाण्याची बचत करण्यासाठी ठिंबक, मल्चिंगचा वापर केल्यास कमी खर्चात योग्य उत्पादन मिळेल अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी त्यावेळी मार्गदर्शन करतांना दिली. जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना ठिबकचे 106 कोटीचे अनुदान दिले असून, 45 हजार 975 ठिबकचे सेट शेतकऱ्यांना दिलेले आहे. यामुळे 30 हजार 658 हेक्टरला लाभ मिळाला, असून आणखी 11 कोटीची मागणी शासनाकडे केली आहे. प्रत्येक तालुक्यातील समस्या वेगवेगळ्या असल्यामुळे मेळाव्याच्या माध्यमातून विचारांचे व शेतीतील अनुभवातून माहितीची देवाण-घेवाण होणार आहे.










