गणेगांव दु।। (नांद्रेमळा) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजीराव नांद्रे पाटील याचे सुपुत्र चि.शरद व मांडवगण फराटा येथील प्रगतशील श...
गणेगांव दु।। (नांद्रेमळा) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजीराव नांद्रे पाटील याचे सुपुत्र चि.शरद व मांडवगण फराटा येथील प्रगतशील शेतकरी हनुमंतराव शितोळे देशमुख यांची सुकन्या स्वरांजली यांचा मांडवगण फराटा येथील पुण्याई लॉन्समध्ये शुक्रवार दि. 25 मार्च 2016 रोजी सायंकाळी 6.45 वाजता मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. भा.ज.प.नेते खा.दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, शिवसेनेचे घनशाम शेलार, भाऊसाहेब गोरे, प्रतीभाचे व्हा.चेअरमन महादेव गांधले, समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव रफीक इनामदार, खरेदी विक्री संघाचे मा.चेअरमन दिपक भोसले, ह.भ.प.बबन महाराज गदादे, पत्रकरा संघाचे अध्यक्ष शकीलभाई शेख, घोडगांवचे माजी व्हा.चेअरमन दादा पा. फराटे, नागवडे कारखान्याचे संचालक योगेश भोयटे, प्रा.सुनिल माने, भा.ज.प.चे जिल्हासरचिटणीस संतोष लगड, ता.अध्यक्ष बाळासाहेब महाडीक, भा.ज.पा.कर्जतचे अध्यक्ष खेडकर, जिजाबाई शिंदे, सतिष कुतवळ, शिवाजीराव पाचपुते, अशोकराव शितोळे, अंकुशराव शितोळे, राजाराम शितोळे, नवनाथ शितोळे आदिंसह राजकीय, सामाजिक, क्रिडा व सर्व क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नांद्रे पा. व शितोळे देशमुख ही दोन्हीही कुटुंबे समाजात आदराची स्थान असलेली कुटुंबे असल्याने पुण्याई लॉन्स गर्दीने अगदी फुलुन गेले होते. सायंकाळच्या रम्य वातावरणात विद्युत रोषणाई व त्यातच मनोरंजनासाठी आयोजीत केलेला ऑर्केस्ट्रॉने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भा.ज.प. महिला आघाडीच्या अध्यक्षा सुवर्णाताई पाचपुते, सचिन पाचपुते व हनुमंतराव शितोळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर शिवाजीराव बापू नांद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.











