श्रीगोंदा (प्रतिनिधी) - तालुक्यात कित्येक वर्षापासून अशुध्द व दुर्गंधीयुक्त व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून पाणी आरोग्यास हानीका...
श्रीगोंदा (प्रतिनिधी) - तालुक्यात कित्येक वर्षापासून अशुध्द व दुर्गंधीयुक्त व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून पाणी आरोग्यास हानीकारक असल्याने ते पिण्यास योग्य नाही. परिसरातील नागरिक या त्रासामुळे हैराण झालेले आहे. त्यामुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्याबाबत प्रत्येक वेळा शासनाकडे निवेदन देऊनही त्याचा पाठपुरावा होत नाही. याबाबत प्रशासन गंभीर दिसत नाही. नगरपरिषद व पदाधिकारी-अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शिवसेनेच्यावतीने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी नगर परिषदेसमोर मटका फोडो आंदोलन सुरु करण्यात आले. यावेळी सेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब गोरे, घनशाम शेलार, संजय आनंदकर, सुनिल काळे, प्रकाश निंभोरे, नंदकुमार ताडे आदिंसह सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी आंदोलकांनी आपले मनोगत व्यक्त करून मटके फोडून निषेध व्यक्त केला. शुध्द व पूर्ण दाबाने पाणी देण्यात यावे. बंद पडलेल्या फिल्टर हाऊसचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे. घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे. बाजारतळावरील घाणीचे साम्राज्य दूर करावे. तसेच स्वच्छता गृह उभारण्यात यावे. अशा मागण्यांचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी जलशुद्धिकरणाचे ठिकाणी क्लोरीनेशन युनिट बसवण्याचे आदेश दिले. एका आठवड्यात ते पूर्ण होईल व नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करता येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.










