अहमदनगर - अहमदनगर पहिली मंडळी (काँग्रीगेशनल) ह्यूम मेमोरियल चर्च याठिकाणी रेव्ह.अनिल व्ही. साताळकर यांनी राजीनामा दिल्यापासून (सन 200...
अहमदनगर - अहमदनगर पहिली मंडळी (काँग्रीगेशनल) ह्यूम मेमोरियल चर्च याठिकाणी रेव्ह.अनिल व्ही. साताळकर यांनी राजीनामा दिल्यापासून (सन 2004) मंडळी नियुक्त पाळक नव्हते. चर्चच्या घटना व नियमावलीनुसार रेव्ह.पी.जी.घोडके यांची काही काळ हंगामी मॉडरेटर म्हणून नियुक्ती होती. यानंतर रेव्ह.सी.बी.उजागरे यांची अहमदनगर चर्च कौन्सिलने हंगामी मॉडरेटर म्हणून सन 2006 साली नेमणूक केली होती. मात्र 21 फेब्रु.2016 रोजी रेव्ह.उजागरे यांचे निधन झाले. म्हणून कौन्सिलने त्या रिक्त पदावर हंगामी मॉडरेटर म्हणून रेव्ह.सनी पंडितराव मिसाळ यांची नेमणूक घटना व नियमावलीनुसार केली होती व आहे. सदर नियुक्तीस यु.सी.एन.आय. जनरल अॅसेम्बलीचे मॉडरेटर रेव्ह.सी.पी.भुजबळ यांनी लेखी मान्यता दिलेली आहे.
दरम्यान सद्य स्थितीत ह्यूम मेमोरियल चर्च येथील हंगामी कार्य़कारी समितीवर काही भ्रष्टाचारांचे आरोप आहेत. काही सभासदांनी सदर व्यक्तीच्या विरुध्द पोलिस स्टेशन व न्यायालयामध्ये खाजगी फौजदारी गु्न्हे दाखल केलेले आहे. ही बाब विचारात घेता नवीन पाळकाची लोकशाही पध्दतीने नियुक्ती होईपर्यंत रेव्ह.सनी मिसाळ यांची हंगामी मॉडरेटर म्हणून नियुक्ती केलेली आहे अशी माहिती अहमदनगर चर्च कौन्सिलचे सेक्रेटरी रेव्ह.सुनिल भांबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
व्ही.आर.डी.येथील केंद्रीय कर्मचारी रेव्ह.प्रदीप गोविंद मकासरे, यांना सरकारी केंद्रीय कर्मचारी सेवाशर्तीनुसार सेवेत असतांना दुसरे लाभाचे पद स्विकारता येत नाही तरीही विविध धार्मिक विधिच्या माध्यमातून जमा होणारे दान, देणगी, शुल्क आदि प्रकारातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम स्वतःकडे जमा केलेली आहे. मात्र आजतागायत त्याचा हिशोब चर्चकडे सुपुर्द केला नाही. सन 2005 ते 2015 या काळातील 2004-05 चे काही महिने वजा जाता उर्वरीत काळातील हिशोब रेव्ह.प्रदीप गोविंद मकासरे, सुनिल एस. सोनावणे, जॉनसन शेक्सपिअर, नंदकिशोर जाधव, विद्यासागर भोसले आदि मंडळींनी दिलेला नाही.
तथाकथित भ्रष्टाचारामुळे धार्मिक कार्य़ धोक्यात येऊ नये. सभासदांमध्ये दहशत व असंतोष आहे. असे रेव्ह.सुनील भांबळ, सेक्रेटरी अहमदनगर चर्च कौन्सिल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.










