नगर - नगर तालुक्यातील मांजरसुंभा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत चेअरमनपदी ...
नगर - नगर तालुक्यातील मांजरसुंभा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत चेअरमनपदी श्री. लक्ष्मण कदम यांची व व्हा. चेअरमनपदी इंद्रभान कदम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या दोघांच्या नावाची सूचना जालिंदर कदम यांनी मांडली. त्यास गोरक्षनाथ कदम यांनी अनुमोदन दिले. या दोघांची सलग तिसर्यांदा या पदावर निवड झाली आहे.
याप्रसंगी बद्रिनाथ कदम, छगन कदम, राजू वाघमारे, आसाराम कदम, जनार्दन कदम, गोवर्धन कदम, मंदा कदम, कलाबाई कदम आदींसह सोसायटीचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. सचिव ठाणगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.










