नेवासा - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ...
नेवासा - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आज दि. 15 मार्च रोजी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यांना बदनाम करण्याच्या प्रयत्नातून हा कट रचला गेला. ही कारवाई न थांबल्यास आम्ही रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करु असा इशारा माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते पांडुरंग अभंग यांनी बोलतांना दिला.
सध्याचे सरकार दीडशहाणे असून भुजबळ साहेबांची ओबीसी संघटनेची ताकद सहन होत नसल्याने त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न अशा आरोपाच्या माध्यमातून होत आहे. हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. प्रसंगी गावोगावी आंदोलन छेडू असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले.
नेवासा तहसील प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने झालेल्या निषेध सभेप्रसंगी तालुकाध्यक्ष कारभारी जावळे यांनी प्रास्ताविकात सरकारच्या कारवाईचा निषेध करीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.वेळी बोलतांना जि.प.चे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे म्हणाले की, एकीकडे जनता दुष्काळाने होरपळलेली असतांना सरकारने मदत करण्याऐवजी भुजबळ साहेबांना आरोपाखाली अटक करण्याचे सत्र सुरु केले. सदरची कार्यवाही चुकीची असून जनता त्यांच्या पाठीशी आहे असे स्पष्ट केले. यावेळी भुजबळ साहेबांना अटक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशी घोषणा यावेळी तहसील प्रांगणात देण्यात आल्या नायब तहसीलदार नारायण कोरडे यांना हे निवेदन देण्यात आले.
यावेळी विश्वासराव गडाख, रामभाऊ जगतपा, नंदकुमार पाटील, नानासाहेब तुवर, भाऊसाहेब मोटे, शंकरराव लोखंडे बापूसाहेब गायके, रम्हभाई पठाण, तुकाराम काळे मामा, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस दिलीप सरोदे, भैय्यसाहेब देशमुख, अॅड.देसाई देशमुख, जयप्रकाश रासने, तुकाराम मिसळ, एकनाथराव कावरे, बापूराव बहिरट, शंकरराव भास्कर, नरसुशेठ लष्करे, शिवा गवळी, गणेश दारुंटे, काशीनाथ नवले, तुकाराम मिसाळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा नेते गणेश गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले.










