नगर - पारनेर तालुक्यातील जवळा भागातील दलित युवक नितीन साठे याला चौकशीसाठी 27 मे 2015 रोजी अटक करण्यात आले. त्याचा पोलीस कोठडीतच संशय...
नगर - पारनेर तालुक्यातील जवळा भागातील दलित युवक नितीन साठे याला चौकशीसाठी 27 मे 2015 रोजी अटक करण्यात आले. त्याचा पोलीस कोठडीतच संशयतरित्या मृत्यु झाल्याप्रकरणी निलंबीत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांना सीआयडीच्या पथकाने बुधवारी दुपारी पुणे येथे अटक करण्यात आले. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
केडगाव परिसरातून दि. 27 मे 2015 रोजी दलित युवक नितीन बाळू साठे याला कोतवाली पोलिसांनी संशयित म्हणून अटक केले होते. चौकशी दरम्यान तो पोलीस कोठडीतून पळून गेला होता. त्याला पोलिसांनी पुन्हा पकडून पोलीस कोठडीत मारहाण केली त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असतांनाच त्याचा मृत्यु झाला. दलित युवकाच्या मृत्युमुळे दलित संघटना संतप्त झाली. त्यावेळी 6 जणांना तातडीने निलंबीत करण्यात आले. व या खटल्याचा तपास सीआय़डीकडे सोपविण्यात आला. त्या चौकशीदरम्यान 6 जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला पैकी 4 जणांना आधीत अटक केले होते. बुधवारी दुपारी ढोकले यांना त्यांच्या राहत्या घरात पथकाने त्यांना ताब्यात घेतले व रात्रीच नगरला आणण्यात आले.










