जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने नगरमधील विविध संस्था संघटनांच्या वतीने 'महिला सन्मान' महोत्सव घेण्यात येणार आहे व समाजातील कष्...
जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने नगरमधील विविध संस्था संघटनांच्या वतीने 'महिला सन्मान' महोत्सव घेण्यात येणार आहे व समाजातील कष्टकरी-कर्तत्ववान महिलांना 'पद्मकन्या पुरस्कार' देण्यात येणार आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिध्द खादी कापडाचे तरुण व्यापारी जितेंद्र वल्लाकट्टी यांची एकमताने निवड झाली अशी माहिती प्रा.विठ्ठल बुलबुले व प्रकाश कोटा यांनी दिली.
हा महोत्सव म्हणजे मुलांनी आपल्या आईचा... भावांनी आपल्या बहिणीचा... समाजाने आपल्या लेकीचा केलेला आदर सत्कार होय...! अशी भूमिका घेवून 2015 पासून महिला महोत्सव घेण्यात येत आहे. या वर्षीच्या महोत्सवात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अजय लयचेट्टी, तिरमलेश पासकंटी यांनी दिली.









