रत्नागिरी : गेल्यावर्षी दिवाळीमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, एसटीला होणारा तोटा भरून काढण्यासाठी दि. ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत लवच...
रत्नागिरी : गेल्यावर्षी दिवाळीमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, एसटीला होणारा तोटा भरून काढण्यासाठी दि. ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत लवचिक भाडेवाढ करण्यात आली होती. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या प्रवाशांना या तिकीटवाढीचा दणका बसणार आहे. महामंडळातर्फे दि. २२ ऑगस्ट २0१४ रोजी नियमित भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर इंधनाच्या दरातील चढ-उतार विचारात घेता महामंडळाने तिकीट दर स्थिर ठेवले होते. भाडेवाढ केवळ गर्दीच्या हंगामासाठी लागू राहणार आहे. प्रत्येक तिकिटामागे एक रुपयाची वाढ प्रवाशांना सोसावी लागणार आहे. महामंडळातर्फे अपघातग्रस्त मृत प्रवाशांच्या नातेवाइकाला ३ लाख रुपये व जखमी प्रवाशाला ४0 हजार रुपयांपासून ७५ हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाते. या रकमेत वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार मृत प्रवाशांच्या वारसांना दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत.तसेच जखमींना देण्यात येणार्या मदत निधीतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित वाढीव निधी देण्यासाठी तिकीटदरावर एक रुपयाची वाढ करण्यात येणार आहे. संबंधित भाडेवाढीची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून लागू होणार आहे.









