शहराचा विकास साधण्यासाठी विविध योजनेअंतर्गत अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यत विकास पोहचवण्याचा प्रयत्न करणार आह...
शहराचा विकास साधण्यासाठी विविध योजनेअंतर्गत अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यत विकास पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. शहर विकासाच्या दृष्टिने सर्वांच्या कल्पकतेतून विकासकामे पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आपल्या मनोगतात महापौर कळमकर म्हणाले.
यामध्ये विविध घटकांचा समावेश आहे. जसे सावेडीत गंगा उद्यानातील जागेत अँम्युझमेंट पार्क, पर्यटन विकासास प्रोत्साहन, पाणी योजना, सौर उर्जा प्रकल्प, भुयारी गटार योजना, महापुरूषांचे पुतळे, राष्ट्रीय शहरी योजना अभियान, घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प, विकास आराखड्यातील रस्ते प्रकल्प, सावेडी उपनगरात नाट्यगृह व स्मशानभूमी , खासगीकरणाच्या माध्यमातून चौक सुशोभिकरण, महापौर चषक स्पर्धा, नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध कामे, दलित विकास योजना आदीं कामांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.










