हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नेवासा शहरातून भव्य मिरवणूकीस दुपारी एक वाजता नेवासा बस स्...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नेवासा शहरातून भव्य मिरवणूकीस दुपारी एक वाजता नेवासा बस स्थानका पासून शिवजयंती मिरवणूकीस सुरवात झाली.
यावेळी सजविलेल्या रथात शिवरायांचा पुतळा ठेवण्यात आला होता . श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज , आ.बाळासाहेब मुरकुटे,तहसीलदार नामदेव टिळेकर, पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय कांबळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका अध्यक्ष बाबासाहेब पवार, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे आदींच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले रस्त्यावर भगवे झेंडे, भगव्या फेट्यांच्या गर्दीमुळे नेवासा शहर व मिरवणूक भगवी ठरली.
छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण नेवासे शहर दुमदुमले होते . सर्वपक्षीय तसेच सर्वधर्मिय शिवप्रेमी नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे यावेळीच्या शिवजयंती मिरवणूकीचे वैशष्टय मानावे लागेल. शहरातील चौकाचौकात तोफांच्या सलामीने मिरवणूकीचे स्वागत करण्यात आले. व सर्वधर्मीय नागरिकांनी मिरवणूकीचे स्वागत केले. तसेच ग्रामपंचायत चौकात शिवरायांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यावर शिवप्रेमीनी हातात भगवे झेंडे घेऊन डान्स केला . तर या मिरवणुकीत सर्वपक्षीय नेत्यांसह शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे, जालिंदर गवळी, बंडू शिंदे, निरज व सुरज नांगरे, संतोष पंडूरे, संजय सुखधान, नितीन दिनकर, सुशिल धायजे, सागर पंडूरे, अशोक उपळकर, आदींसह मोठय़ा संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते .
शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चौकाचौकांत मास्टर सुरेशकुमार लव्हाटे यांच्या लहान वयातील विद्यार्थ्यांनी लाठी, दांडपट्टा, तलवार यासह अनेक शिवकलेची प्रात्यक्षिके सादर केली. दुपारी चार वाजता मोहिनीराज मंदिरासमोर पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल लंभाते, उपनिरीक्षक शरद गोर्ड़े, उपनिरीक्षक शशिकांत जोशी, उपनिरीक्षक गणेश जांभळे, बाबा लबडे, बाळासाहेब नागरगोजे, अल्ताफ शेख, यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला तर मिरवणुकीसाठी नेवासे पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता










