नगर- महाराष्ट्र वारकरी संघटना व काशिविश्वनाथ देवस्थान ट्रस्ट आयोजित 2016 ‘गौरव भुमिपुत्रांचा’ पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि.7 मार्च ...
नगर- महाराष्ट्र वारकरी संघटना व काशिविश्वनाथ देवस्थान ट्रस्ट आयोजित 2016 ‘गौरव भुमिपुत्रांचा’ पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि.7 मार्च 2016 रोजी महाशिवरात्रीला संपन्न होणार आहे.अशी माहिती राज्य वारकरी संघटनेचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे यांनी दिली.
श्री काशी विश्वनाथ देवस्थान ढोरजा ता.श्रीगोंदा येथे होणार्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे खा.दिलीप गांधी, आ.राहुल जगताप, माजी मंत्री बबन पाचपुते, बाबासाहेब भोस, अण्णा साहेब शेलार आदिसह मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे उपस्थित राहतील. तर ह.भ.प. छगन महाराज मालुसरे, ह.भ.प. पंढरीनाथ महाराज देवकर उपस्थित रहाणार आहेत. ट्रस्टच्या वतीने वर्षभरात अखंड हरिनाम सप्ताह, महाशिवरात्री उत्सव आणि श्रावण महिन्यामध्ये यात्रा असे उत्सव होतात. या देवस्थानचा काशी खंड या पवित्र ग्रंथात उल्लेख आहे. नगर जिल्ह्यात वारकरी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या कार्यकर्त्यांना पुरस्कार सन्मान चिन्ह देवुन गौरवण्यात येणार आहे. महाशिवरात्रीला होणार्या या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन झेंडे महाराज केले आहे.










