Archive Pages Design$type=blogging

नगर क्लबचे सदस्यत्व आता मुलींनाही - दत्ता खोजे

या देशात महिलांना राज्यघटनेने समान हक्क अधिकार दिले असताना नगर क्लब मात्र क्लबच्या घटनेचा आधार घेऊन सभासदांच्या मुलींना सदस्य करून घेण...


या देशात महिलांना राज्यघटनेने समान हक्क अधिकार दिले असताना नगर क्लब मात्र क्लबच्या घटनेचा आधार घेऊन सभासदांच्या मुलींना सदस्य करून घेण्यास टाळाटाळ करत आहे, अशी तक्रार ज्येष्ठ सभासद दत्ता खोजे यांनी राष्ट्रीय महिला आयोग, पंतप्रधानांसह सर्व संबंधितांकडे केली होती. त्याची दखल घेऊन लवकरच मुलींना सभासदत्व देण्याची कार्यवाही सुरू होणार असल्याचे सचिव अॅड. विकी मुथा यांनी मंगळवारी सांगितले. 

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर खोजे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मुलींना क्लबचे सभासदत्व द्यावे, अशी मागणी मी वेळोवेळी क्लबच्या व्यवस्थापनाकडे केली. वार्षिक सभेत याबाबत ठराव संमत करून घेऊन नियमाप्रमाणे घटना दुरुस्ती केल्यानंतर बघू, असे उत्तर देण्यात आले. राष्ट्रीय महिला आयोगाकडे संपर्क साधल्यानंतर मुलींना सभासदत्व देण्याचा ठराव २०१४ मध्ये मंजूर करण्यात आला, पण लिगल कमिटी स्थापन करून त्या अहवालानुसार कार्यवाही केली जाईल, असे सांगून अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली. 

सभासदांच्या मुलींना सभासदत्वच द्यायचे नाही नाईलाजाने द्यावेच लागले, तर सर्वसामान्यांना परवडणारी फी ठेवायची या धोरणाने १८ ते २५ वयोमर्यादेतील मुलींना २५ हजार लग्न झालेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींसाठी दोन लाख रुपये फी करण्यात आली आहे. समितीच्या या निर्णयाचा आपण निषेध करतो, असे खोजे यांनी निवेदनात म्हटले आहे. 

क्लबचे सभासदत्व मिळण्यास पात्र असलेल्या सभासदांच्या मुलींना वयाच्या १८ व्या वर्षी सभासदत्वासाठी असलेल्या फीमध्ये किंवा नाममात्र १००० रुपये नाममात्र फीमध्ये सभासदत्व देण्यात यावे. लग्न झाल्यानंतर परगावी स्थायिक झालेल्या महिलांना नाममात्र वार्षिक फी ठेवावी, अशी मागणी खोजे यांनी केली आहे. 

क्लबने १०० पेक्षा जास्त सभासद नवीन करून घेताना एकाही मुलीस सभासदत्व दिलेले नाही. यासंदर्भात मी केलेला पाठपुरावा मान्य नसल्याने संचालकांच्या धोरणास साथ दिल्याने माझे सभासदत्व रद्द करण्याच्या हालचाली क्लबमध्ये सुरू आहेत, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, यासंदर्भात क्लबचे सचिव अॅड. मुथा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुलींना सभासदत्व देण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल, असे स्पष्ट केले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: नगर क्लबचे सदस्यत्व आता मुलींनाही - दत्ता खोजे
नगर क्लबचे सदस्यत्व आता मुलींनाही - दत्ता खोजे
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_301.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_301.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago