शेवगाव - केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर अबकारी कर लादल्यामुळे देशभरातील सुमारे ४० लाख सुवर्ण कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण...
शेवगाव - केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर अबकारी कर लादल्यामुळे देशभरातील सुमारे ४० लाख सुवर्ण कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. पाच लाख सराफ व्यावसायिक उद्ध्वस्त होतील. मॉलचे राज्य प्रस्थापित करू पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात संघर्ष करावा, असे आवाहन राज्य सराफ संघटनेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा सराफ-सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष संतोष वर्मा यांनी केले.
अबकारी कराविरोधात मार्चपासून सराफ व्यावसायिकांनी देशव्यापी बंद आंदोलन पुकारले आहे. यानिमित्त येथील बालाजी मंदिरात आयोजित शेवगाव तालुका सराफ-सुवर्णकार संघटनेच्या बैठकीत वर्मा बोलत होते. संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र डहाळे, विजय डहाळे, संजय शेवाळे, प्रवीण लाहोटी, विजय देवळालीकर, राजेंद्र जिरेसाळ, संजय पंडित, सलीम बंगाली आदी उपस्थित होते.










