नगर- शांतानंद महाराज ट्रस्टच्यावतीने वर्षभर अध्यात्मिक उपक्रम राबविण्यात येतच आहेत, त्याचबरोबर पर्यावरण जनजागृती, वृक्षसंवर्धन, स्व...
नगर- शांतानंद महाराज ट्रस्टच्यावतीने वर्षभर अध्यात्मिक उपक्रम राबविण्यात येतच आहेत, त्याचबरोबर पर्यावरण जनजागृती, वृक्षसंवर्धन, स्वच्छता मोहिम याबाबतही समाजप्रबोधन करुन अध्यात्म व जनजागृतीची अनोखी सांगड ट्रस्टने घातली आहे. शांतानंद महाराजांचे कार्य अत्यंत महान होते. बलभिम डोके परिवाराच्या वतीने शांतानंद महाराजांचे कार्य अविरतपणे पुढे नेण्यात येत आहे. सर्वसामान्यांसाठी सतत काहीना काहीतरी करण्याची तळमळ डोके परिवाराची असते, असे प्रतिपादन महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.
एकनाथ षष्ठीनिमित्त पारनेर तालुक्यातील रायतळे ते पैठण या प.पू.शांतानंद महाराज पायी दिंडीचे नगरमध्ये बाराबाभळी, भिंगार येथील उषादेवी बलभिम डोके विद्या मंदिर शाळेत नगरवासीयांच्या वतीने महापौर अभिषेक कळमकर यांनी दिंडीचे स्वागत करुन दिंडी चालक हभप महादेव महाराज काळे यांचा सत्कार केला. यावेळी वृक्षमित्र बलभिम डोके परिवाराच्यावतीने दिंडीची मुक्काम व भोजन व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आली होती. याप्रसंगी माजी पोलिस अधिकारी एस.एम.खेडकर, एम. के. कदम, डॉ.गोपाळ पवळे, उल्हास तापकिर, राजेंद्र झोडगे, माणिक कावरे आदिंसह दिंडीतील 300 वारकरी उपस्थित होते.










