अहमदनगर : नगर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉँग्रसेची कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे यांनी बुधवारी जाहीर केली. नगर शहराचे के...
अहमदनगर : नगर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉँग्रसेची कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे यांनी बुधवारी जाहीर केली. नगर शहराचे केडगाव, भिंगार, सावेड व मुकुंदनगर असे चार विभागप्रमुख नव्या कार्यकारिणीत नियुक्त करण्यात आले आहेत. १८ उपाध्यक्ष, २ सरचिटणीस व ११ सचिवांसह ३६ जणांची ही कार्यकारिणी आहे.
शहर जिल्हा कार्यकारिणी तयार करताना शहराचे मुकुंदनगर, केडगाव, भिंगार व सावेडी असे चार विभाग करण्यात आले असून प्रत्येक विभागाला एक प्रमुख देण्यात आला आहे. केडगावच्या विभागप्रमुखपदी मनोज कराळे तर भिंगारच्या प्रमुखपदी संजय खताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावेडी व मुकुंदनगर विभागप्रमुखांची नियुक्ती नंतर केली जाणार आहे. जुन्या-नव्यांचा मेळ घालत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणी जाहीर करताना शहराच्या प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकारिणीत आणखी नावे नव्याने समाविष्ट केले जातील, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. नगरसेवक अरीफ शेख, विपुल शेटीया, माजी नगरसेवक अविनाश घुले यावेळी उपस्थित होते.
नव्या शहर कार्यकारिणीच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. शहर विकासासाठीही प्रयत्न केले जातील. तरुणांच्या शाळा, महाविद्यालयातील प्रवेश, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून केला जाईल, असे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे यांनी सांगितले. कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष- सारंग पंधाडे, सचिन गरदास, अमित खामकर, संजू दिवटे, शाम नाईक, सागर गुंजाळ, अमोल कांडेकर, जय भोसले, विकास भाऊसाहेब उडानशिवे, चेतन बिडकर, वैभव पोकळे, राजू कोकणे, सचिन धोत्रे, भूषण अंभोरे, योगेश म्हस्के, मोहित पंजाबी, पंकज भंडारी, सुजित शिंदे, सरचिटणीस- अँड. गजेंद्र दांगट, उमेश क्षीरसागर, सचिव- सुरज जाधव, ओमकार, देशमुख, गौरव बोरुडे, आशिष कासार, ऋषिकेश ताठे, उमेश निस्ताने, रामकृष्ण पिंपळे, पंकज भुतारे, प्रणव भालेराव, पियुष कटारीया, महावीर भंडारी, खजिनदार- राहुल जाधव, प्रवक्ता-विजय वाघ.










