पारनेर : तालुक्यातील निघोज येथील दारूबंदीच्या फेरमतदानासाठी राज्य उत्पादनशुल्क विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामु...
पारनेर : तालुक्यातील निघोज येथील दारूबंदीच्या फेरमतदानासाठी राज्य उत्पादनशुल्क विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे आता फेरनिवडीबाबत न्यायालयातून काय निर्णय होतो? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यानंतर थेट फेरनिवडणूक जाहीर करता येईल का? याबाबत जिल्हाधिकारी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.निघोज येथे दारूबंदीसाठी फेरमतदान होण्यासाठी दारूबंदी कृती समितीचे प्रमुख बबन कवाद, डॉ. महेंद्र झावरे, प्रशांत वराळ, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, गणेश लंके यांच्यासह महिलांनी रविवारी गव्हाणवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते.
यावेळी पोलिसांनी महिलांवर लाठीमारही केला होता. त्यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आंदोलनस्थळी येऊन दारूबंदीसाठी सोमवारी न्यायालयात जिल्हा प्रशासन म्हणणे सादर करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर फेरमतदानाची तारीख ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी मुंबईत राधाकृष्ण विखे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य उत्पादनशुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची बबन कवाद, महेंद्र झावरे, प्रशांत वराळ यांनी भेट घेऊन पुन्हा दारूबंदीसाठी फेरमतदान घेण्याचा आग्रह धरला होता. विधानसभेतही याबाबत चर्चा झाली होती.










