Archive Pages Design$type=blogging

नगर येथे ६ मार्चला महिला आरोग्य संमेलन

नगर - येथीलपी. एम. मुनोत मेमोरिअल ट्रस्टतर्फे पुणे येथील पी. एम. शहा फाउंडेशनच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य भरार...



नगर - येथीलपी. एम. मुनोत मेमोरिअल ट्रस्टतर्फे पुणे येथील पी. एम. शहा फाउंडेशनच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य भरारी अंतर्गत रविवारी (६ मार्च) दुपारी ते या वेळेत धार्मिक परीक्षा बोर्ड येथे महिला आरोग्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मुनोत मेमोरिअल ट्रस्टचे शरद मुनोत यांनी सोमवारी दिली. 
मुनोत मेमोरिअल ट्रस्टतर्फे पी. एम. शहा फाउंडेशनच्या सहकार्याने मागील वर्षांपासून शहरात "डॉक्टर तुमच्या भेटीला' अंतर्गत वेगवेगळ्या विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. घरातील व्याप सांभाळताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कौटुंबिक व्यापात त्या इतक्या गर्क असतात की, त्यांना आपल्या आरोग्याच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वेळच मिळत नाही. ही कोंडी कशी फोडायची? आरोग्याच्या समस्येला कसे सामोरे जायचे? रडत, कढत की, आनंदात? आरोग्याचे प्रश्न अनेक आहेत. उत्तर आपल्या हातात आहे, नव्हे आपल्या मनोवृत्तीत आहे. महिलांचे आरोग्य सदृढ असेल, तरच त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य सदृढ राहील. त्यासाठी महिला आरोग्य संमेलनाचे आयोजन केले आल्याचे शरद मुनोत यानी सांगितले. या महिला संमेलनात "स्वत:ला समजून घेताना' या विषयावर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आरती 
पेंडसे यांचे, तर "स्त्रियांचे कर्करोग - गैरसमज वास्तवता' या विषयावर डॉ. रितू बियानी मार्गदर्शन करणार आहेत. दैनंदिन जीवनात कोणती योगासने करावीत, याबाबतही तज्ज्ञांमार्फत संमेलनात मार्गदर्शन केले जाणार आहे. आरोग्याविषयी डॉक्युमेंटरी दाखवण्यात येईल, असे मुनोत यांनी सांगितले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: नगर येथे ६ मार्चला महिला आरोग्य संमेलन
नगर येथे ६ मार्चला महिला आरोग्य संमेलन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_33.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_33.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago