नगर - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महापालिकेने मंगळवारी महिलांना विशेष भेट देण्याचे ठरवले आहे. महिला दिनी (८ मार्च) दिवसभर सर्व महि...
8 मार्चला जगभर महिला दिन साजरा होतो. नगर शहरातही यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेने महिला दिनी महिलांना विशेष भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहर बसमधून महिलांना मंगळवारी दिवसभर मोफत प्रवास करू देण्याचा निर्णय महापौर अभिषेक कळमकर यांनी घेतला आहे. तशी सूचना त्यांनी बससेवेची अभिकर्ता संस्था मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. शहरात विविध मार्गांवरून २१ शहर बस धावतात. या बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. महिलांना कायमस्वरूपी बससेवा मोफत देण्याचा विचार महापालिका स्तरावर सुरू आहे. परंतु त्याआधी महिला दिनाचे औचित्य साधून किमान एक दिवस मोफत बससेवा देण्याचा निर्णय महापौर कळमकर यांनी घेतला आहे. बससेवेबरोबरच महिलांना सिध्दिबागेतील जलतरण तलावात सायंकाळी ते या वेळात मोफत पोहण्याचा आनंद घेता येईल. महापालिकेच्या या निर्णयाचे महिला वर्गातून स्वागत होत आहे.
शुभेच्छा स्वरूपात भेट - महिलादिनानिमित्त महिलांना शुभेच्छा स्वरूपात काहीतरी भेट मिळावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक दिवस शहर बसमधून मोफत प्रवास देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहेत. शहरातील सर्व महिलांना
महिला दिनाच्या शुभेच्छा.











