भिंगार - जागतिक महिला दिन व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून मानस प्रतिष्ठान आयोजित भिमा गौतमी वस्त...
भिंगार - जागतिक महिला दिन व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून मानस प्रतिष्ठान आयोजित भिमा गौतमी वस्तीगृहातील अधीक्षिका सौ.रजनीताई भिमराव जाधव यांना भीम गौतमी वस्तीगृहातील सर्व विद्यार्थीनींना घडविण्याचे कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव समिती तर्फे आदर्श माई महिला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन सुरवात करण्यात आली. या कार्य़क्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा.बैचे सर तर प्रमुख पाहुणे कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक मा.महेंद्रकुमार आहिरे साहेब यांच्या हस्ते सौ.रजनी जाधव यांना माई महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अहमदनगर जिल्हा पोलीस क्रेडीट सोसायटीच्या निवडणुकीत मा.सचिन सुदाम शिरसाठ भरघोस मताने विजय झाल्याबद्दल व राष्ट्रवादी युवक काँग्रेस भिंगार शहराध्यक्ष पदी मा.संजय खताडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.










