पाथर्डी - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी गहिनीनाथ शिरसाट यांची उपसभापतीपदी विष्णू सातपुते यांची बिनविरोध निवड झाली. स्वच्छ ...
पाथर्डी - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी गहिनीनाथ शिरसाट यांची उपसभापतीपदी विष्णू सातपुते यांची बिनविरोध निवड झाली. स्वच्छ व शेतकरी हिताचा कारभार करू, असे नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी सांगितले. बाजार समितीच्या यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कारभाराचे लेखापरिक्षण करून नवीन कारभार सुरू करण्याची घोषणा अॅड.प्रताप ढाकणे यांनी केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी सहाय्यक निबंधक चेतन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालकांची बैठक झाली. सभापती पदासाठी गहिनीनाथ शिरसाट तर उपसभापती पदासाठी विष्णू सातपुते यांचेच अर्ज आले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे चौधरी यांनी जाहीर केले. त्यांनतर जगदंबा आघाडीच्या कार्यकर्त्यांची बाजार समितीच्या मैदानावर सभा झाली. माजी आमदार चंद्रशेखर घुले, अँड. प्रताप ढाकणे, बाळासाहेब ताठे, किरण शेटे, बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे ,नारायण धस, वसंत आमटे, संपत गायकवाड, अशोक आकोलकर, वंसत आमटे, राजेंद्र खेडकर अमोल बडे आरती निर्हाळी, रत्नमाला उदमले आदी उपस्थित होते.










