नगर - अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या वतीने अरणगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन माजी ...
नगर - अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या वतीने अरणगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा समाजकल्याण अधिकारी र्रिेंक मुन्शी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिबिरामध्ये अरणगाव गावाचे सर्व्हेक्षण सूक्ष्मरितीने करण्यात यावे, असे सांगितले. त्यामध्ये गावाच्या निकडीच्या गरजा व त्या गरजांच्या प्राधान्य क्रमानुसार कार्यक्रमाची आखणी करणे विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रावसाहेब अनभुले होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे व डॉ. अजित फुंदे होते. राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दि. 28 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत होणार आहे. या शिबिराचे नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. रिजवान अहमद यांनी केले.










