नगर - आचार्य तुलसी यांच्या अणुव्रत विचार प्रसारासाठी अणुव्रत सेविका सौ.अलका मेहता सांखला यांच्या पुढाकाराने नगर जिल्ह्यात अणुव्रत स...
नगर - आचार्य तुलसी यांच्या अणुव्रत विचार प्रसारासाठी अणुव्रत सेविका सौ.अलका मेहता सांखला यांच्या पुढाकाराने नगर जिल्ह्यात अणुव्रत समितीच्या कार्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील पहिल्या अणुव्रत समितीची स्थापना नुकतीच श्रीगोंदा येथे मेहता यांच्या जन्मगावी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज कॉलेजचे प्राचार्य शामराव लवांडे आणि अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष सुधीर मेहता यांच्या हस्ते या समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन श्रीगोंद्यातील महामानव बाबा आमटे विकास केंद्राच्या कार्यालयात करण्यात आले.
स्वातंत्र्य सैनिक रमणलाल मेहता सार्वजनिक वाचनाल आणि स्टडी सर्कलच्या माध्यमातून सुरु झालेल्या या समितीच्या अध्यक्षपदी प्राचार्य शामराव लवांडे यांची निवड करण्यात आली. व्यसनमुक्तीचे कार्यात अग्रेसर असलेले ग्रंथपाल नारायण गवळी, चंदुशेठ कटारिया, जवाहर मेहता, आनंद झेंडे, संजय मेहता, माधव महाजन यांच्यासह वाचनायाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.










