Archive Pages Design$type=blogging

नगरमध्ये सापडला ब्रिटिशकालीन पुतळा

जिल्हा परिषद प्रशासनाने सापडलेला पुतळा वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. रवींद्र साताळकर, संतोष यादव यांच्याकडे सुपूर्द क...




जिल्हा परिषद प्रशासनाने सापडलेला पुतळा वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. रवींद्र साताळकर, संतोष यादव यांच्याकडे सुपूर्द केला. स्टेशनरोडला जिल्हा परिषदेचे जुने गोडाऊन व जागा आहे. तेथील जागेच्या साफसफाईचे काम सुरू असताना चार दिवसांपूर्वी कर्मचार्‍यांना हा ब्रॉँझ धातुचा पुतळा सापडला. या पुतळ्याबाबत जिल्हा परिषदेकडे काही रेकॉर्ड व माहिती नाही. 
ऐतिहासिक वास्तू संग्रहालयाकडे हा पुतळा दिला आहे. -विठ्ठल बढे, शाखा अभियंता, जिल्हा परिषद वस्तू संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर हा पुतळा बसविण्यात येणार आहे. तसेच हा पुतळा लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यासारखा दिसत असला तरी त्यावर तसा काही उल्लेख नाही. पुतळ्यावर '१९३५' असे लिहिलेले आहे. माऊंटबॅटन यांचा भारतातील कार्यकाल मात्र, १९४७ ते १९४८ असा आहे. त्यामुळे हा त्यांचा पुतळा आहे की नाही, याबाबत संभ्रम आहे. संतोष यादव, अभिरक्षक, ऐतिहासिक वास्तू संग्रहालय अरुण वाघमोडे - अहमदनगर शहरातील स्टेशनरोडवरील जिल्हा परिषदेच्या जुन्या गोडाऊनमध्ये ७५ वर्षांपूर्वीचा व १५0 किलो वजनाचा ब्रॉँझ धातूपासून बनविलेला ब्रिटिशकालीन अर्धाकृती पुतळा आढळून आला आहे. या पुतळ्याचा चेहरा भारतातील शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या चेहर्‍याशी साम्य दर्शवितो. 
मात्र, हा त्यांचाच पुतळा असल्याचा उल्लेख नाही. जिल्हा परिषदेच्या स्टेशनरोडवरील जुन्या गोडाऊनमध्ये चार दिवसांपूर्वी कर्मचारी साफसफाई करत असताना त्यांना हा पुतळा आढळून आला. चार फूट उंच व १५0 किलोपर्यंत या पुतळ्याचे वजन आहे. पुतळ्याच्या पाठीमागे इंग्लीशमधून 'चावन्स फौंड्री, बडोदा १९३५' असे लिहिलेले आहे. या पुतळ्याची रचना आकर्षक पद्धतीने केलेली आहे. गळाबंद कोट असा पेहराव पुतळ्यात दिसतो. 
प्रथमदर्शनी हा पुतळा भारतातील शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यासारखाच दिसतो. गुजरात राज्यातील बडोदा येथे हा पुतळा तयार करण्यात आला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने हा पुतळा ऐतिहासिक वास्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. रवींद्र साताळकर व संतोष यादव यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: नगरमध्ये सापडला ब्रिटिशकालीन पुतळा
नगरमध्ये सापडला ब्रिटिशकालीन पुतळा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgP6WNsqXRIFMDdz_9E7SMAH-SZ_BgqRiWbEOWxfzf68mJdVyDLciao-v0qMtonyU_8hHg0FTeZR-etRYCJduRmAyGfosaLq3zUaS1hqba3x8AhGkXH78PrqheGdLDDSnuCiaZOpBvHel8O/s320/British.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgP6WNsqXRIFMDdz_9E7SMAH-SZ_BgqRiWbEOWxfzf68mJdVyDLciao-v0qMtonyU_8hHg0FTeZR-etRYCJduRmAyGfosaLq3zUaS1hqba3x8AhGkXH78PrqheGdLDDSnuCiaZOpBvHel8O/s72-c/British.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_36.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_36.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago