पारनेर - वृत्तपत्रात बातमी छापल्याच्या रागातुन सुपा येथील पत्रकार शरद रसाळ यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्...
पारनेर - वृत्तपत्रात बातमी छापल्याच्या रागातुन सुपा येथील पत्रकार शरद रसाळ यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने संबंधितांवर कारवाई करून अटक करावी अन्यथा आंदोलन करण्यात येइल असा इशारा पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने सुपा पोलिसांना निवेदानाद्वारे देण्यात आला आहे.
पत्रकार संघाचे सदस्य शरद रसाळ यांनी पोलिस ठाण्यात आलेल्या भोयारे गांगर्ड ता. पारनेर येथील तक्रारिची बातमी छापली होती. ही बातमी छापल्याचा राग येउन प्रशांत भास्कर रसाळ व रविंद्र भाउसाहेब रसाळ यांनी व्हौट्सप ग्रुप वरील संभाषनात अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली आहे याबाबत सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. धमकी देणाऱ्या दोघांवर दखलपात्र गुन्हा नोंदवुन त्यांना त्वरित अटक करावी अन्यथा पारनेर पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच पत्रकारांवर वारंवार होणार्या हल्ल्यांबाबत पोलिस व प्रशासनाने वेळीच कारवाई करण्याची मागणी केलि आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय वाघमारे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चौधरी, दत्ता उनवने, देविदास अबुज, उदय शेरकर, प्रमोद गोल़े, शरद झावरे, दादा भालेकर, भास्कर कवाद, सतीश ठुबे, चंद्रकांत कदम, सतीश रासकर, संतोष इधाटे, तुषार भाटिया, शरद रसाळ आदि पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, सुपा पोलिसांनी पत्रकार शरद रसाळ यांच्या फिर्यादिवरुन गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे करत आहेत.










