नगर - मुलाचा वाढदिवस पारंपारिक पध्दतीने साजरा करण्याची प्रथा सगळीकडेच आहे. या प्रथेला छेद देऊन तरुण धीजर सारडा यांनी आपल्या मुलाच...
नगर - मुलाचा वाढदिवस पारंपारिक पध्दतीने साजरा करण्याची प्रथा सगळीकडेच आहे. या प्रथेला छेद देऊन तरुण धीजर सारडा यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवशी पर्यावरण जागृतीचा अनोखा उपक्रम राबवला. सारडा यांचा मुलगा स्वयम् हा टाईनी टॉट्स या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकत आहे.
त्याच शाळेतील सुमारे 150 विद्यार्थ्यांना तुळशीची रोपे देऊन पर्यावरण जागवण्याचा त्यांनी संदेश दिला आहे.तसेच त्यांनी तुळशीच्या पानांचे शास्त्रीय व धार्मिक महत्व पटवून सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे
शाळेतील शिक्षकांसह मित्रपरिवारांनीही कौतुक केले.










