अहमदनगर - शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असलेले लक्ष्मी माता मंदिर हे 100 ते 150 वर्षापासून वहिवाटेसाठी गवळी समाजाला दान म्हणून दिलेल...
अहमदनगर - शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असलेले लक्ष्मी माता मंदिर हे 100 ते 150 वर्षापासून वहिवाटेसाठी गवळी समाजाला दान म्हणून दिलेले आहे. परंतु सध्या त्या मंदिराच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे गवळी समाजबांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात.
तरी या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी, मंदिर दुरुस्ती करुन वहिवाटेसाठी व मांडव बांधण्याच्या परवानगीसाठी समस्त गवळी समाजाने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे हे निवेदन सादर केले आहे.










