प्रतिनिधी - कर्जत शहरातील जय मल्हार शू पॅलेस या दुकानास आग लागून पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. ही घटना (दि.२९) रोजी मध्यरात्र...
प्रतिनिधी - कर्जत शहरातील जय मल्हार शू पॅलेस या दुकानास आग लागून पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. ही घटना (दि.२९) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.कर्जत शहरातील कुळधरण रस्त्यावरील बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या जय मल्हार शू पॅलेस या सुसज्ज दुकानास मध्यरात्री आग लागल्याचे लक्षात आले. ही आग विझविण्यासाठी मोठे शर्तीचे प्रय▪करण्यात आले. मात्र, दुष्काळी परिस्थिती व पाण्याची कमरता, यामुळे आग विझविण्यात मोठा अडथळा आला.चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या दुकानाचे मालक गणोश जाधव यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून या दुकानाची उभारणी केली होती. कर्जतमध्ये आगीच्या घटना वाढू लागल्या आहेत. येथे अग्निशमन बंब नसल्याने त्याची कमतरता जाणवते. त्यामुळे नगरपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरासाठी त्वरित अग्निशमन बंब उपलब्ध करावा, अशी मागणी यानिमित्त केली जात आहे. सदरची आग ही शोर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज काढला जात आहे. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनला आकस्मात घटनेची नोंद झाली आहे. पोलिसानी पंचनामा केला आहे. या आगीत अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.










